
अक्कलकोट : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य करीत असल्याने लेक लाडकी, लाडकी बहीण योजना व शेतकरी हिताच्या अनेक योजना महायुती सरकारने राबविल्या आहेत. लाडकी बहीण योजना बंद पडणार, अशा कितीही अफवा विरोधकांनी पसरविल्या तरीही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाही देत आम्ही दिलेला शब्द पाळतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सभेला तब्बल नऊ तास उशिरा येऊनसुद्धा मोठी गर्दी समोर पाहून जनता जनार्दनाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी साष्टांग दंडवत घातला.