
FDA takes 82 food samples for testing; Satara team on high alert for festival season
Sakal
सोलापूर : विजयादशमी हे दिवाळी हा कालावधी उत्सव कालावधी म्हणून ओळखला जातो. या कालावधीत मिठाईसह इतर अन्नपदार्थांची मागणी वाढलेली असते. उत्सव कालावधीत ग्राहकांना भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न प्रशासनाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. विजयादशमी ते आतापर्यंत संशयित अन्नपदार्थांचे जवळपास ८२ नमुने या विभागाने घेतले आहेत. दिवाळीसाठी सात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.