esakal | इकोफ्रेंडली बाप्पा संकल्पनेला हातभार! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

इकोफ्रेंडली बाप्पा संकल्पनेला हातभार! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पर्यावरण जनजागृतीमध्ये खारीच वाटा उचलण्यासाठी संगणक प्रशिक्षकाचे काम करणारे अमित कामतकर यांनी यंदा प्रथमच पर्यावरणपूरक गणपतींचा स्टॉल मांडला आहे.

इकोफ्रेंडली बाप्पा संकल्पनेला हातभार! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सोलापूर: नैसर्गिक साधनसंपत्ती वाचविण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रमाला हातभार म्हणून पर्यावरणपूरक गणपती विक्री हे पहिले पाऊल आहे. पर्यावरण जनजागृतीमध्ये खारीच वाटा उचलण्यासाठी संगणक प्रशिक्षकाचे काम करणारे अमित कामतकर यांनी यंदा प्रथमच पर्यावरणपूरक गणपतींचा स्टॉल मांडला आहे. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशमूर्ती विक्रीसाठी शहरात ठिकठिकाणी स्टॉल मांडले आहेत. अनेक स्टॉलधारकांनी ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग सिस्टिम ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाची पध्दत बदली आहे. या बदलत्या उत्सव पध्दतीमुळे गेल्या वर्षांपासून घरोघरी "श्रीं'चे विसर्जन करण्यात येत आहे. पर्यावरण जनजागृती हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. मातीच्या मूर्ती पाण्यात त्वरित विरघळतात आणि पर्यावरण वाचविण्यासाठी हातभार असे दुहेरी समाधान यातून होणार आहे. ही गरज ओळखून कामतकर यांनी जुळे सोलापूर परिसरात पर्यावरणपूरक गणपती विक्रीचा स्टॉल थाटला आहे. याठिकाणी शाडूच्या मातीपासून बनविण्यात आलेले गणेशमूर्ती विक्रीसाठी आहेत. आसरा चौक, जुळे सोलापूर, साखर कारखाना, भारत माता, मजरेवाडी आदी परिसरातील भक्‍तांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

सण-उत्सवामध्ये एक श्रध्देचा भाव असतो. तो भाव कायम ठेवण्यासाठीदेखील निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मूर्ती व निर्माल्य विसर्जन करू नये. इकोफ्रेंडली बाप्पा ही संकल्पना सर्व भक्‍तांनी अंमलात आणावी. ही जबाबदारी इथेच संपत नाही, तर प्रत्येक कृतीतून कायम ठेवावी.

- अनघा कुलकर्णी

इकाफ्रेंडली बाप्पांचे घरीच विसर्जन करण्याचे ठरविले आहे. मातीने तयार झालेली मूर्ती पाण्यात लवकर विरघळते आणि मूर्तीची विटंबनाही होत नाही. आता पर्यावरणपूरक गणपतीची उपलब्धता होत आहे. सर्व भक्‍तांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढे यावे.

- अजित कार्यकर्ते

loading image
go to top