esakal | अस्थिर अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

अस्थिर अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

एमएस्सीच्या केमिस्ट्री विषयातून पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दुबईतून एक आणि अफगाणिस्तानातील एका विद्यार्थ्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रवेश घेतला.

अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) एमएस्सीच्या (MSc) परीक्षा कोरोनामुळे (Covid-19) ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गावी गेलेल्या मुलांना ऑनलाइनमुळे घरबसल्या परीक्षा देण्याची सोय विद्यापीठाने करून दिली. त्यामुळे दुबई (Dubai) आणि अफगाणिस्तानातील (Afghanistan) दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशातून ही परीक्षा दिली. त्यांनीही विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

हेही वाचा: उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या

एमएस्सीच्या केमिस्ट्री विषयातून पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दुबईतून एक आणि अफगाणिस्तानातील एका विद्यार्थ्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रवेश घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांचा व्हिसा पाहून त्यांची राहण्याची स्वतंत्र सोय करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले होते. विद्यापीठाने हॉस्टेलमध्ये त्यांच्या राहण्याची स्वतंत्र सोय करून दिली. दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. मात्र, परीक्षेला खूप विलंब होऊ नये म्हणून ऑनलाइन परीक्षा घेण्याचा पर्याय पुढे आला. तत्पूर्वी, विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये कोरोना रुग्णांसह संशयितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले. त्यामुळे हॉस्टेलवरील सर्व मुलांना त्यांच्या गावी परतावे लागले. त्यात दुबई व अफगाणमधील दोन मुलांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडील व्हिसाची मुदत संपली आणि त्यांना पुन्हा येता आले नाही. विद्यापीठाने त्यांच्याशी संपर्क करून त्यांना ऑनलाइन परीक्षेची लिंक पाठविली. दोघांनीही विनाअडथळा परीक्षा दिली आणि त्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये दोघेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: DRDO करतेय रिसर्च असोसिएट्‌स पदांची भरती! 54000 रुपये वेतन

एक ऑक्‍टोबरपासून ऑफलाइन कॉलेज?

कोरोनामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयेदेखील बंदच आहेत. सध्या आठवी ते दहावीचे वर्ग सुरू असतानाही जिल्ह्यातील कोणतेच महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेले नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाइन धडे दिले जात असून, त्यांना प्रात्यक्षिकाची चिंता आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या सर्वच वर्गाच्या, अभ्यासक्रमाच्या परीक्षा पार पडल्या आहेत. आता महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ऑक्‍टोबरपासून आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून तेव्हापासून ऑफलाइन कॉलेज सुरू होतील, असा विश्‍वास विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा संचालक डॉ. विकास कदम यांनी व्यक्‍त केला.

loading image
go to top