esakal | महिन्यात दोन्ही डोस घ्या! "नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

नॅक समितीच्या भेटीपूर्वी विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत, असे आदेश विद्यापीठाने काढले आहेत.

महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : नॅक मूल्यांकनासाठी (NAC assessment) ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमिटी विद्यापीठात येणार आहे. नॅक समितीच्या भेटीपूर्वी विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कोरोनावरील (Covid Vaccine) लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत, असे आदेश पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) कुलसचिव डॉ. विकास घुटे (Dr. Vikas Ghute) यांनी काढले आहेत. लसीकरणानंतर (Vaccination) त्याची माहिती संबंधित विभाग प्रमुखांमार्फत आस्थापना विभागाला द्यावी, असेही त्या आदेशात नमूद केल्याने सर्वजण चिंतेत आहेत.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) विद्यापीठासह महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते. राज्यातील 15 पैकी काही अकृषिक विद्यापीठांचे मूल्यांकन यापूर्वीच झाले आहे. विद्यापीठ व त्याच्याशी संलग्नित महाविद्यालयांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व दर्जा वाढविण्यासाठी नॅक मूल्यांकन अनिवार्य असते. मात्र, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे, महाविद्यालय, विद्यापीठातील असुविधा, तयारीसाठी येणारा लाखोंचा खर्च, त्यातून अनेकांनी या मूल्यांकनाकडे पाठ फिरविली. 2022 पर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे. त्यामध्ये 2.5 पेक्षा अधिक गुण मिळविणे आवश्‍यक आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी विद्यापीठाची धडपड सुरू आहे. विद्यापीठाने नॅक मूल्यांकनासाठी प्रस्ताव पाठविल्यानंतर आता ऑक्‍टोबरमध्ये नॅक कमिटी सोलापुरात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापकांना कोरोनावरील प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसची सक्‍ती केली आहे. विद्यापीठात लसीकरणाचा कॅम्प आयोजित करणे शक्‍य असतानाही तसा प्रयत्न होत नसल्याची काहीजणांची ओरड आहे.

हेही वाचा: 'भाजयुमो'च्या जिल्हाध्यक्षासह चौघे तडिपार!

कालावधी अपुरा, तरीही सक्‍तीचे आदेश

शहर-ग्रामीणमध्ये लसीकरणासाठी गर्दी वाढत असतानाच पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याची स्थिती आहे. कोविशिल्डच्या प्रमाणात कोवॅक्‍सिन लस टोचून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक कोविशिल्ड लस टोचून घेत आहेत. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा आणि कोवॅक्‍सिन लसीच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. विद्यापीठाने काढलेल्या आदेशामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन्ही डोस कसे पूर्ण करायचे, असा प्रश्‍न सतावू लागला आहे.

loading image
go to top