मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांच्या निरामय आरोग्यासाठी विठ्ठलाला साकडे | Pandharpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे संकट दूर होताच विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या भाविक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निरामय आरोग्यासाठी विठ्ठलाला साकडे

पंढरपूर : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुबई येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारपणातून लवकर बरे व्हावेत या साठी पंढरपुरात संत नामदेवमहाराज समाधीस्थळी वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिभक्त पारायण तात्या महाराज चौगुले, हरिभक्त पारायण सतीश महाराज कंधारकर, हरिभक्त पारायण नारायण दीघे यांच्यासह वारकरी भाविक यांनी साकडे घालून‌ पूजा केली.

ह.भ.प.तात्या महाराज चौगुले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने नव्हे तर राज्यातील सामान्य जनतेचे कुटूंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या संकट काळात जनतेची अतिशय काळजी घेतली आहे. कोरोनाचे संकट दूर होताच विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले केल्याने आता कार्तिकी वारीच्या ओढीने भाविक पंढरपूरकडे येऊ लागले आहेत. अशातच ६५ वर्षावरील वृद्ध आणि लहान बालके यांनाही मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा: नागपूर : हिरवा वाटाणा २५०, कोथिंबीर १५० रूपये किलो!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. ते या आजरातून लवकर बरे होवोत आणि त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो या साठी आज संत नामदेव महाराज यांच्या समाधीस्थळी विधीवत पूजा करून,तुळशी अर्चना करून भाविकांच्या वतीने साकडे घालण्यात आले. यावेळी शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख ( पंढरपुर विभाग ) मा. संभाजीराजे शिंदे, जेष्ठ शिवसैनिक जयवंत ( आण्णा ) माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. सुधीरभाऊ अभंगराव, जेष्ठ शिवसैनिक मा.काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख मा. पोपटनाना सावतराव, लंकेश काकासाहेब बुराडे, सचिन बंदपट्टे, विनय वनारे, बाबा अभंगराव, अविनाश वाळके, तानाजी मोरे, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी, अरुण कांबळे, मनोज शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top