esakal | शिक्षकांचा पगारासाठी नेहमीचाच शिमगा! गौरी-गणपतीच्या सणालासुद्धा खिसा रिकामाच!
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांचा पगारासाठी नेहमीचाच शिमगा! गौरी-गणपतीच्या सणालासुद्धा पगार नाहीच!

जिल्ह्यातील दहा हजार प्राथमिक शिक्षकांचा पगारासाठी नेहमीचाच शिमगा असून, गौरी-गणपतीच्या सणालासुद्धा पगार दहा तारखेच्या आत झाला नाहीच.

शिक्षकांचा पगारासाठी नेहमीचाच शिमगा! गौरी-गणपती सणालाही खिसा रिकामाच

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : जिल्ह्यातील दहा हजार प्राथमिक शिक्षकांचा (Teachers)) पगारासाठी नेहमीचाच शिमगा असून, गौरी-गणपतीच्या (Gouri-Ganpati) (Ganesh Chaturthi) सणालासुद्धा पगार दहा तारखेच्या आत झाला नाहीच. सलग तिसऱ्या महिन्यात पगार उशिरा होत असल्याने आणि याच महिन्यात ऐन सणासुदीचे दिवस असल्याने पगाराविना सण साजरा करणे शिक्षकांना अवघड झाले आहे. ऐन सणासुदीच्या महिन्यात जिल्ह्यातील सुमारे दहा हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन लांबले आहे. सप्टेंबरची 13 तारीख उलटली तरी अद्याप ऑगस्टचे वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ लागला आहे. ऐन सणासुदीला शिक्षकांवर शिमगा करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: 16 सप्टेंबरपासून सुरू होतील शहर-जिल्ह्यातील महाविद्यालये!

जानेवारी महिन्यापासून शिक्षकांच्या वेतनात अनियमितता आली आहे. गेल्या वर्षभरात अपवाद वगळता शिक्षकांच्या वेतनाला 20 तारीख उजाडते. गेल्या जून महिन्यापासून तर मागील महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या 30 तारखेला झाला आहे. याचा फटका केवळ पगारावर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य शिक्षकांना बसत आहे. बॅंकांचे होम लोन, पर्सनल लोन, सोसायट्यांचे हप्ते, घरभाडे, दूध, वीजबिल तसेच सणांचा बाजार आणि फराळासह इतर शोभेचे साहित्य खरेदीसाठी अडचणी येत आहेत. मुलांची शैक्षणिक फी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचा, प्राध्यापकांचा पगार महिन्याच्या एक तारखेला होतो. मात्र, प्राथमिक शिक्षकांच्या पगारीलाच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत विलंब होत आहे. या नेहमीच लांबत चाललेल्या पगारामुळे प्राथमिक शिक्षकांची अडचण झाली आहे.

हेही वाचा: 'उजनी' @ 70.43 % ! पाणीसाठ्यात होतेय वाढ; शेतकऱ्यांमधून समाधान

खरे तर मागील महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या एक तारखेलाच झाला पाहिजे, असा शासकीय आदेश असताना आणि गेल्याच महिन्यात सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याबरोबर झालेल्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठकीत पगार एक ते पाच तारखेपर्यत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे शिक्षकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पगाराअभावी कुचंबणा होत आहे. याकडे ना तालुका, जिल्हास्तरावरचे अधिकारी लक्ष देतात, ना पदाधिकारी. एरव्ही किरकोळ प्रश्नावर उठसूट आंदोलन, उपोषण करणाऱ्या शिक्षक संघटनांच्या गावी पगाराचा विषय फार गंभीरपणे चर्चेला येतच नाही.

शिक्षकांना अशैक्षणिक कामांसह ऑनलाइनची ढीगभर कामे करण्याचा तगादा लावणाऱ्या प्रशासनाने किमान सणासुदीच्या महिन्यात तरी शिक्षकांचा पगार एक ते पाच तारखेदरम्यान करायला हवा.

- संगीता देवकते, शिक्षिका ढोकबाभूळगाव, ता. मोहोळ

loading image
go to top