
Liquor sales dip in Solapur after sharp price hike in desi and foreign brands.
Sakal
सोलापूर: जिल्ह्यात २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची विक्री ८ लाख १३ हजार १८४ लिटर दारूची विक्री झाली होती. २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात मात्र ५ लाख ७४ हजार १ लिटर विदेशी दारूची विक्री झाली. म्हणजेच २ लाख ३९ हजार १८३ लिटर कमी दारूची विक्री झाली. हे विक्री घटण्याचे प्रमाण तब्बल २९.४१ टक्के आहे. देशी दारू, वाईन आणि बिअरचीही विक्री घटली असून दुसरीकडे महसूल उद्दिष्ट ५९० कोटींचे असल्याने हे गणित कसे साधायचे या विचाराने अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे.