
उ.सोलापूर : वन्य प्राण्यांकडून शेतीची प्रचंड नासधूस होत आहे. याकडे वन विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असून यावर आवाज उठवणार असल्याची घोषणा खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी तसेच युवकांचेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.