govind barge
sakal
वैराग : गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाने नर्तकीशी असलेल्या प्रेम संबंधातून सासुरे (ता. बार्शी) येथे मंगळवारी गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी संशयित नर्तकी पूजा गायकवाड हिला बार्शी न्यायालयाने बुधवारी हजर केले. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र, गोविंद यांच्या नातेवाइकांनी हा घातपाताची शक्यता असल्याचे वर्तवली आहे. सदर घटनेचा वैराग पोलिसांना छडा लावणे आव्हान ठरले आहे. गोविंदच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.