अबब! बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 47 हजार कट्टे कांद्याची आवक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion
अबब! बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 47 हजार कट्टे कांद्याची आवक!

अबब! बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 47 हजार कट्टे कांद्याची आवक!

बार्शी : येथील लातूर रस्त्यावर असलेल्या खासगी लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) कांद्याची (onion)47 हजार कट्टे आवक झाली आहे उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति क्विन्टल 2100 रुपये इतका दर मिळाला असल्याची महिती बाजार समितीचे चेअरमन रणजित राऊत यांनी दिली.

हेही वाचा: संक्रांतीनिमित्त बाजारात गर्दी...

बार्शी येथील लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थापना झाल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी योग्य सुविधा देणारी बाजार समिती याच बरोबर कांद्याचे प्रसिद्ध मार्केट म्हणून नावारूपाला आली आहे.यावर्षीच्या हंगामात कांद्याची विक्रमी आवक सुरू असून मंगळवारी (ता.11)रोजी 237 गाड्यातुन सुमारे 47 हजार कट्टे कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये परांडा,भूम, कळब,उस्मानाबाद,तुळजापूर,करमाळा,माढा,मोहोळ आदी भागातून कांद्याची आवक होत आहे. लिलावात माऊली राज ट्रेडींग व रेहन ट्रेडींग या व्यपाऱ्यांकडे आलेल्या कांद्याला सर्वोच्च दर मिळाला मंगळवारी कांद्याला 700 ते 2100 रुपये असा दर मिळाला आहे.

हेही वाचा: हैदराबाद व सोलापूरचे पाच तरूण निघाले रतन टाटांकडे...

लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कांदा आंध्रप्रदेश,तामिळनाडू,दिल्ली राज्यासह बांगलादेश मध्येही पाठवला जातो बाजार समितीमध्ये कोरोना नियमाचे (Corona rules)पालन करत व्यापारी, शेतकरी,अडते यांना मास्क,सोशल डिस्टनन्सिंग,सॅनिटायझर यासह शासनाच्या सूचनांचे पालन याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे चेअरमन रणजित राऊत यांनी यावेळी सांगितले. या बाजारसमितीमध्ये जनावरांचा बाजारही मोठ्या प्रमाणात भरत असून तालुक्यासह परिसरातील पशूपालक उपस्थित असतात तसेच व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असून योग्य किंमत मिळत असल्याने शेतकरी बांधवांची खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top