ब्रेकिंग ! बार्शीत काळ्या बाजारात विक्रीस जाणारे "इतक्‍या' लाखांचे धान्य जप्त, एकास अटक 

Barshi
Barshi
Updated on: 

बार्शी (सोलापूर) : बार्शी येथील दलाल भीमाशंकर खाडे याच्यावर 110 टन तांदूळ पनवेल येथे काळ्या बाजारात विक्री केल्याचे उघडकीस येताच, महसूल आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही विभागांनी संयुक्तपणे दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे चार लाखांचा गहू व तांदूळ जप्त केला असून, तीन जणांविरोधात शहर व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

श्रीकांत दिगंबर नान्नजकर (रा. आझाद चौक, बार्शी), संतोष विलास गोडसे (रा. अरणगाव), शिवाजी मारुती पांगरे (रा. उपळाई ठोंगे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुरवठा निरीक्षक अभयकुमार साबळे, हवालदार अजित वरपे यांनी फिर्यादी दाखल केल्या. ही घटना शुकवारी उपळाई ठोंगे येथे दुपारी चार वाजता तर मार्केट यार्डात रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. 

शहरातील तुळजापूर रस्त्यावरील मार्केट यार्ड येथील गाळा क्रमांक आठ व नऊ या गाळ्यांमध्ये शासकीय रास्त भाव धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अमोल ननवरे, केकान, लगदिवे, बागल व गोसावी यांनी नान्नजकर यांना दूरध्वनी केला पण त्यांचा फोन बंद होता. घरातील फोनवर फोन करून माहिती दिली तरी ते आले नाहीत. मार्केट कमिटीचे सचिव जगदाळे, पुरवठा अधिकारी, दोन पंच यांच्यासमवेत कुलूप तोडून पाहणी केली असता काळ्या, पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या ठिक्‍यांमध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाचे 12 हजार 550 क्विंटल गहू, याची किंमत एक लाख 88 हजार 250 रुपये, 280 ठिके तांदूळ 14 हजार क्विंटल याची किंमत दोन लाख 10 हजार रुपये असे तीन लाख 98 हजार 250 रुपयांचे धान्य जप्त करण्यात आले. 

उपळाई ठोंगे येथे गणपत शंकर रगडे याच्या घरात आठ ठिके गहू तर 35 ठिके तांदूळ यांची किंमत सहा हजार 850 असून या दोन्ही छाप्यात सापडलेल्या ठिक्‍यांवर भारतीय खाद्य निगम तसेच पंजाब, हरियाना, महाराष्ट्र सरकारचे शिक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रिकामी ठिके होती. शासनाची फसवणूक व अत्यावश्‍यक वस्तू अधिनियमानुसार बार्शी शहर व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवाजी पांगरे यास अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व अमोल ननावरे हे तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sugarcane Price Protest in Solapur Raju Shetti Leads Farmers March Against Mills Demanding Fixed First Payment Per Tonne
Swabhimani Farmers March in Solapur
Maharashtra Farmers Get Higher Crop Loss Compensation 11000 for Dryland 22000 for Irrigated and 30000 for Perennial Land
Huljanti Yatra 2026 Five Lakh Devotees Gather for Mahalingray Biroba Palkhi Meeting Amid Drums Chants and Bhandara