esakal | माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले ! शोधमोहीम सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

तुरुंगातून कैदी पळाले

माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले! शोधमोहीम सुरू

sakal_logo
By
किरण चव्हाण

विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये माढा सबजेलमधे असलेले चार आरोपी सोमवारी (ता. 19) सकाळी जेलमधून पळून गेले आहेत.

माढा (सोलापूर) : विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये माढा सबजेलमधे (Madha Subjail) असलेले चार आरोपी (Criminals) सोमवारी (ता. 19) सकाळी जेलमधून पळून गेले आहेत. पलायन केलेल्या आरोपींच्या शोधासाठी विविध पथके पाठवून व नाकाबंदी करून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. (Four serious offenses prisoners escaped from Madha sub-jail-ssd73)

हेही वाचा: अबब! 61 लाखांची ऑनलाइन फसवणूक; शिक्षकांसह नोकदार आमिषाला बळी

याबाबतची अधिक माहिती अशी, की सोमवारी (ता. 19) सकाळी माढा सबजेलमधून सिद्धेश्वर शिवाजी केचे, अकबर सिद्धाप्पा पवार, आकाश ऊर्फ अक्षय रॉकी भालेकर, तानाजी नागनाथ लोकरे अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे असून, या आरोपींवर खून, बनावट चलनी नोटा व्यवहार, पोक्‍सो, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. यातील दोन कुर्डुवाडी तर दोन टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडील गुन्ह्यांतील आहेत.

हेही वाचा: "एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

माढा तहसील कार्यालयाच्या आवारातच माढ्याचे सबजेल आहे. या भागात दिवसभर लोकांची वर्दळ असते. मात्र, सकाळच्या वेळी या ठिकाणी विशेष वर्दळ नसते. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची दोन व माढा पोलिसांची तीन पथके तैनात केल्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे (Police Sub-Inspector Kiran Ghongade) यांनी सांगितले.

loading image