esakal | "प्रधानमंत्री आवास'साठी मंगळवेढा तालुक्‍यातील 13893 लाभार्थी पात्र !
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री आवास

"प्रधानमंत्री आवास'साठी मंगळवेढा तालुक्‍यातील 13893 लाभार्थी पात्र !

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना समावेश करण्यासाठी ड नमुन्यातील फॉर्म भरून घेण्यात आले होते.

मंगळवेढा (सोलापूर) : ग्रामीण भागातील बेघर, निवारा नसलेल्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत (Pradhanmantri Awas Yojana) ड नमुन्यात अर्ज दाखल केलेल्या तालुक्‍यातील तब्बल 13 हजार 893 लाभार्थ्यांना पडताळणीतून पात्र ठरविण्यात आले. तर 1266 लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. 2011च्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारावर तालुक्‍यामध्ये घरकुलाचे लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. त्यातून जवळपास 6500 घरकुल लाभार्थ्यांची अंतिम निवड निश्‍चित करण्यात आली. परंतु या सर्वेक्षणापासून अनेक कुटुंबे वंचित राहिल्याची ओरड झाल्यानंतर शासनाने या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना समावेश करण्यासाठी ड नमुन्यातील फॉर्म भरून घेण्यात आले होते. (Fourteen thousand beneficiaries from Mangalwedha taluka became eligible for Pradhan Mantri Awas Yojana)

हेही वाचा: श्‍वानांचे लसीकरण आवश्‍यकच! जाणून घ्या "रेबीज'ची लक्षणे व घ्यावयाची दक्षता

यामध्ये तालुक्‍यामधील 15 हजार 139 लाभार्थ्यांनी अर्ज दिले. या अर्जांची छाननी पंचायत समितीतील कर्मचारी व ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात स्थळ पाहणी करून लाभार्थी निश्‍चित करण्यात आले असता त्यामध्ये 13 हजार 893 लाभार्थी पात्र तर 12 हजार 166 लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे 12 हजार 893 लाभार्थ्यांना भविष्यात घरकुलाचा लाभ मिळणे शक्‍य होणार आहे.

हेही वाचा: स्वखर्चातून साकारली शिक्षकाने डिजिटल जंगल क्‍लासरूम !

गावनिहाय पात्र लाभार्थी आणि कंसात अपात्र लाभार्थी...

लक्ष्मी दहिवडी 239 (8), हिवरगाव 177 (25), अरळी 287 (22), मानेवाडी 200 (82), रेवेवाडी 126 (19), ढवळस 96 (9), पडोळकरवाडी 152 (1), धर्मगाव 124 (7), हाजापूर 74 (3), जुनोनी 200 (5), मरवडे 352 (18), येड्राव 153 (31), जंगलगी 98 (2), जालिहाळ 142 (46), तळसंगी 368 (1), गुंजेगाव 129 (16), लोणार 283 (3), बावची 213 (15), भोसे 344 (13), हुलजती 445 (62), खवे 139 (5), शिरनांदगी 258 (3), मारोळी 252 (5), निंबोणी 195 (36), शिरसी 67 (14), तांडोर 147 (15), भाळवणी 170 (38), जित्ती 118 (10), देगाव 47 (अपात्र नाही), ममदाबाद शे. 45 (3), सलगर बु. 302 (11), उचेठाण 131 (25), बोराळे 228 (73), खोमनाळ 131 (17), लमाणतांडा 164 (13), मल्लेवाडी 87 (2), मालेवाडी 68 (3), नंदूर 342 (7), संत चोखामेळा नगर 71 (47), शेलेवाडी 142 (1), अकोला 208 (13), आंधळगाव 256 (43), आसबेवाडी 112 (17), बठाण 78 (4) भालेवाडी 137 (2), ब्रह्मपुरी 245 (7), चिक्कलगी 189 (6), डिकसळ 93 (3), डोणज 235 (13), डोंगरगाव 89 (42), फटेवाडी 50 (4), गणेशवाडी 191 (3), घरनिकी 184 (9), गोणेवाडी 101 (14), हुन्नूर 91 (1), कचरेवाडी 139 (27), कागष्ठ 70 (5), कात्राळ 114 (14), खडकी 176 (5), खुपसंगी 390 (6), लवंगी 185 (36), लेंडवेचिंचाळे 197 (46), माचणूर 108 (49), महमदाबाद हु. 151 (36), मारापूर 237 (अपात्र नाही), मुढवी 114 (अपात्र नाही), मुंढेवाडी 146 (11), नंदेश्वर 516 (21), पाटकळ 400 (2), पौट 87 (11), रहाटेवाडी 39 (9), रड्डे 360 (3), सलगर खुर्द 70 (126), संत दामाजी नगर 76 (11), शिवनगी 104 (14), सिद्धापूर 287 (14), सोड्डी 185 (9), तामदर्डी 108 (9), येळगी 70 (1).

माझ्या सभापतिपदाच्या कार्यकाळात या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित गावचे सरपंच व ग्रामसेवक तसेच जागरूक नागरिकांच्या माध्यमातून प्रबोधन केल्यामुळे तालुक्‍यामध्ये सर्वाधिक अर्ज स्वीकारण्यात आले. सध्या अपात्र केलेल्या 1266 लाभार्थ्यांना आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून फेरसर्व्हेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

- प्रदीप खांडेकर, माजी सभापती

loading image