
सोलापूर : चुंगी (ता.अक्कलकोट) येथील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील लिपिकाने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दोन वर्षांनी त्यांचे निधन झाले. तरीपण, त्यांच्या मुलाला संस्थेने बनावट कागदपत्रांद्वारे अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली आणि शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे अध्यक्ष स्वामीराव पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसांत दिली. अक्कलकोट न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यासह मुख्याध्यापक महादेव केशव माने व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.