
पंढरपूर : विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आषाढी वारीपासून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.