
सोलापूर: पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच ४ एप्रिल २०११ रोजी दुचाकीवरून जाणाऱ्या प्रकाश बलभीम डांगे (रा. सिंधुविहार, सोलापूर) यांना अडवून तिघांनी त्यांच्याकडील दागिने व रोकड काढून तिघांनी जबरी चोरी केली होती. दोघांना पोलिसांनी अटक केली, पण तिसरा संशयित आरोपी पोलिसांना तेव्हापासून सापडला नव्हता. मंगळवारी (ता. १२) ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाजी सुरवसे (मूळगाव रा. बोळेगाव, ता. तुळजापूर) याला सोलापूर शहरातील मंगळवार बाजारात पकडला.