
Funeral procession wading through knee-deep water in flood-hit Chopdi and Nazare villages, Solapur.
Sakal
नाझरे: चोपडी, नाझरे परिसरात गेली दोन दिवस प्रचंड पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे चोपडी येथील गावतळे पूर्णपणे भरले आहे. यामुळे येदुचामळा, रानमळा, सोमेवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. आज रानमळ्यातील एका महिलेचे निधन झाले. या महिलेची अंत्ययात्रा गुडघ्याभर पाण्यातून ग्रामस्थांनी चोपडी येथील स्मशानभूमीत आणली.