स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुख

स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुख
स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुख
स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुखCanva
Summary

सहकारातील महामेरू म्हणजेच शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांचे पितृपंधरवड्याच्या निमित्ताने केलेले हे स्मरण.

सांगोला (सोलापूर) : अकरा वेळा आमदार (MLA) होऊनही त्यांचे पाय जमिनीवर होते. सांगोल्यात ज्यांनी सहकार रुजवला व तो नि:स्वार्थीपणे टिकवला. ज्यांनी अनेक शैक्षणिक व सहकारी संस्थांचे मार्गदर्शक व संस्थापक म्हणून यशस्वीपणे चालविल्या व त्यांच्या विचारावर या संस्था आजही यशस्वीपणे टिकून आहेत, ते सहकारातील महामेरू म्हणजेच शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) ऊर्फ आबासाहेब यांचे पितृपंधरवड्याच्या निमित्ताने केलेले हे स्मरण.

स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुख
ई-पीक नोंदणीमध्ये जिल्ह्यात बार्शी अन्‌ अक्कलकोट अव्वल !

'सहकारातून समृद्धीकडे' या घोषवाक्‍यानुसार महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळे वळण आले होते. सहकारातून अनेकांना रोजगार निर्मिती व एकत्रित व्यवसाय करण्यात यावा, यासाठी अनेक राजकीय मंडळींनी प्रयत्न केला. परंतु सहकारातून खरोखरच सामान्यांचा विकास व त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी नि:स्वार्थीपणे काम करणारे आबासाहेब हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. तालुक्‍यात त्यांनी सहकारी सूतगिरणीद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिलांना रोजगार मिळावा, त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी महिला सूतगिरणीची निर्मिती केली व ती आजपर्यंत यशस्वीपणे सुरू आहे. आज याच पुरुष व महिला सूतगिरणीमध्ये एक हजार दोनशे अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.

15 मे 1969 रोजी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. शैक्षणिक संस्थांमधून प्राथमिकपासून विविध विभागातील पदवीपर्यंत शैक्षणिक शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, विज्ञान महाविद्यालय यांची स्थापना करून यामध्येही आज 300 हून अधिक शिक्षक - शिक्षेकेतर तर 5 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1994 साली महिला सहकारी सहकारी सूतगिरणीची स्थापना केली व 2004 साली प्रत्यक्षात सुरूही केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात विविध संस्थांमध्ये दोन हजाराहून अधिक अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. सहकारी संस्थांमध्ये सर्वांना आपलेपणाची वागणूक देऊन नि:स्वार्थीपणे त्यांनी काम केले व करून घेतले. यामुळेच आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्था आजही यशस्वीपणे सुरू आहेत.

स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुख
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास !

शैक्षणिक व सहकारी संस्था

सांगोला सहकारी सूतगिरणी, महिला सहकारी सूतगिरणी, विज्ञान महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, औद्योगिक वसाहत, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध दूध संस्था अशा विविध शैक्षणिक व सहकारी संस्था आजही यशस्वीपणे सुरू आहेत.

सर्वसामान्य कष्टकरी, कर्मचारी केंद्रबिंदू मानून आबासाहेबांनी तालुक्‍यातील सहकार यशस्वीपणे टिकविला. तोच सहकार व सहकारातील सर्वच संस्था यापुढेही आबासाहेबांच्या विचारानुसारच टिकवून पुढे नेल्या जातील.

- डॉ. बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुख यांचे नातू

सहकारी संस्थेची नि:स्वार्थीपणे देखभाल

सर्व सहकारी संस्था या सर्वांच्या आहेत, त्यांनी कधी स्वतःची मालकी दाखवली नाही. घरातील पंखा बंद पडलेला असताना एका कर्मचाऱ्याने तो एका सहकारी संस्थेतील काढून आणून बसवला होता. आबाहेबांनी आल्यानंतर ते पाहिले असता प्रथम तो पंखा काढून आहे तिथे ठेवण्यास सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com