esakal | मनालीच्या ऑनलाइन इको-फ्रेंडली बाप्पाच्या कार्यशाळेस राज्यातून प्रतिसाद; 700 जणांनी बनवल्या मूर्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

Manali

यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळांतून किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा घेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मनालीने फेसबुक व यू-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेस सोलापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांसह राज्यातील अनेक शहरे व गावांतून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 700 जणांनी या कार्यशाळेतून प्रेरणा घेत यंदा आपल्या घरी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली. 

मनालीच्या ऑनलाइन इको-फ्रेंडली बाप्पाच्या कार्यशाळेस राज्यातून प्रतिसाद; 700 जणांनी बनवल्या मूर्ती 

sakal_logo
By
श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : जुळे सोलापूरच्या ज्ञानेश्वर नगर सोसायटीमधील मनाली जाधव हिने घेतलेल्या इको-फ्रेंडली गणपती बनवण्याच्या ऑनलाइन कार्यशाळेमुळे राज्यातील 700 जणांनी यंदा पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार केली अन्‌ आपापल्या घरी या बाप्पाची स्थापना केली आहे. नुकतीच बारावी पास झालेल्या मनालीचे हे मोठे यश आहे. 

हेही वाचा : महापालिकेचा अजब कारभार! तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेला विसर्जन कुंड आता झाला पूर्ण 

वडील नितीन जाधव हे प्रख्यात मूर्तिकार असल्याने मनालीला मूर्ती बनवण्याचे बाळकडू आपसूकच मिळाले. चौथीत असल्यापासून ती पर्यावरणपूरक गणपती बनवते. गेल्या आठ-दहा वर्षांपासून ती पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळाही घेते. आतापर्यंत तिने अनेकांना प्रशिक्षणाद्वारे पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यास प्रवृत्त केले आहे. सोलापूर शहर व परिसरातील विविध शाळांतून दरवर्षी तिने अशा कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले. "सकाळ-तनिष्का' व सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून महिलांसाठीच्या कार्यशाळेतही तिने अनेक महिलांना पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. 

हेही वाचा : धक्कादायक वास्तव! "येथील' मुलांना तीन महिन्यांनंतरही मिळेना शिक्षण 

यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळांतून किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा घेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मनालीने फेसबुक व यू-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेस सोलापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांसह राज्यातील अनेक शहरे व गावांतून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 700 जणांनी या कार्यशाळेतून प्रेरणा घेत यंदा आपल्या घरी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली. अनेकांनी स्वतः तयार केलेला मातीचा गणपती मनालीला शेअर करत आनंद व्यक्त केला. त्यामुळे मनालीनेही मनापासून समाधान व्यक्त केले. 

याबाबत मनाली म्हणते, आता यापुढे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची ही चळवळ अधिक जोमाने करण्याचा मानस आहे. राज्यातील प्रत्येकाच्या घरी पर्यावरणपूरक गणपतीचीच स्थापना झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. यंदा ऑनलाइन कार्यशाळा घेण्यासाठी वडील मूर्तिकार नितीन जाधव, आई अभिंजली, बहीण मनीषा यांच्यासह अनेकांचे विशेष सहकार्य मिळाल्याने हे यश मिळाले आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेल्या येथील कै. वि. मो. मेहता शाळेचेही चांगले सहकार्य मिळाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top