मोठी बातमी ! महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश वानकर? पक्षाकडून पत्र आल्याची चर्चा

IMG-20200115-WA0019.jpg
IMG-20200115-WA0019.jpg

सोलापूर : शिवसेनेच्या सचिवांनी पाठविलेली नावे परस्पर बदलून महापालिकेच्या स्थायी समितीसाठी स्वत:च्या मर्जीतील मनोज शेजवाल यांच्यासह कोठे समर्थकांना संधी देण्याचा डाव अमोल शिंदे यांच्या अंगलट येण्याची शक्‍यता आहे. नाराज नगरसेवकांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पक्षश्रेष्ठींने विभागीय आयुक्‍तांच्या माध्यमातून महापालिकेला पत्र पाठविल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते म्हणून गणेश वानकर यांची निवड ग्राह्य धरावी, असे त्या पत्रात नमूद असल्याचीही चर्चा आहे.

स्थायी समितीचे समिकरणच बदलणार 
एमआएमएचा गटनेता बदलल्यानंतर अथवा शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बदलल्यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची निवड पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. पक्षांतर बंदी कायद्यान्वये कोठे समर्थक नगरसेवकांना पक्ष सोडून जाताच येणार नाही, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या पत्रानुसार आता थेट विरोधी पक्षनेताच बदलला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे स्थायी समितीची निवडणूक पुन्हा काही महिने लांबणीवर पडेल, अशीही चर्चा आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीसाठी गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले आणि लक्ष्मण जाधव यांची नावे पक्षाकडून जिल्हाप्रमुखांना पाठविण्यात आली. मात्र, त्याजागी मनोज शेजवाल, उमेश गायकवाड आणि अमोल शिंदे यांची नावे पुढे करण्यात आली. पक्षाच्या सचिवांचा आदेश डावलून शिंदे यांनी पक्षाचा आदेश डावलला तर माझा विश्‍वासघात केल्याची भावना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्‍त केल्या. त्यानंतर थेट विरोधी पक्षनेता बदलण्याच्याच हालचालींना वेग आला. विधानसभा निवडणुकीत पक्षाविरुध्द बंडखोरी करीत महेश कोठे यांनी शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. दुसरीकडे मनोज शेजवाल यांनी मोहोळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली. तरीही कोठे यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवण्यात आले. कोठे यांची शहरात ताकद मोठी असल्याने शिवसेनेला आगामी काळात फायदा होईल, पक्षवाढीस त्यांची मदत होईल, हा त्यामागे हेतू होता. मात्र, कोठे यांनी आता शिवसेनेचे धनुष्य खाली ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. तरीही शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसारच राजकारण सुरु केल्याची बाब नाराज पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविली. त्यामुळेच शिंदे यांच्याजागी आता वानकर यांना विरोधी पक्षनेते करावे, असे पत्र पाठविल्याची चर्चा असून त्यावर लवकरच महापौर निर्णय जाहीर करतील, असेही सांगण्यात येत आहे. 

पक्षाचे पत्र की नगरसेवकांचे बहुमत ठरणार निर्णायक 
विधानसभा निवडणुकीनंतर महेश कोठे यांच्याऐवजी राजकुमार हंचाटे यांना विरोधी पक्षनेता म्हणून संधी द्यावी, असे पत्र पक्षाकडून महापालिकेच्या सभागृहात आले. त्याचवेळी सभागृहातील पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांनी स्वाक्षरी करून कोठे हेच आमचे गटनेते असावेत, असे पत्र दिले. त्यावेळी तत्कालीन पिठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोठे कायद्याचा आधार घेत कोठे यांची निवड जाहीर केली. या पार्श्‍वभूमीवर आता पक्षाने गणेश वानकर यांच्या नावे पाठविलेल्या पत्रानुसार सभागृहातील शिवसेनेच्या किती नगरसेवकांची त्यांना संमती असेल आणि त्यांची निवड होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुनिता रोटे यांचे नाव पक्षाकडून आले, मात्र पक्षाच्या चारपैकी तीन सदस्यांनी किसन जाधव यांचे नाव पुढे केल्याने त्यांचीच गटनेतेपदी निवड झाली आहे. एमएमआयमध्येही पक्षाचे पत्र की नगरसेवकांचे बहुमत महत्त्वाचे असा वाद सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com