

Rickshaw Loot Case Solved: Trio Held, Fourth Woman’s Name Revealed
Sakal
सोलापूर : रंगभवन चौकातून सात रस्त्याकडे ७१ वर्षीय आजीबाई रिक्षातून प्रवास करीत होत्या. त्यावेळी चार अनोळखी महिलाही प्रवासानिमित्त रिक्षात बसल्या होत्या. त्या चौघींनी आजीबाईंना दाटी करून त्यांच्याकडील एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यातील तीन महिलांना सदर बझार पोलिसांनी अटक केली, चौथीचाही शोध लागला आहे.