कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते 20 नोव्हेंबरला सन्मान

कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते होणार 20 नोव्हेंबरला सन्मान
कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते होणार 20 नोव्हेंबरला सन्मान
कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते होणार 20 नोव्हेंबरला सन्मानSakal
Summary

येथील नगरपालिकेला कचरामुक्त शहर म्हणून मानांकन मिळाले असून, सोलापूर जिल्ह्यातील ही एकमेव नगरपालिका पात्र झाली आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : येथील नगरपालिकेला कचरामुक्त शहर म्हणून मानांकन मिळाले असून, सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) ही एकमेव नगरपालिका पात्र झाली आहे. नगराध्यक्षा अरुणा माळी (Aruna Mali) व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव (Nishikant Prachandrao) यांचा 20 नोव्हेंबरला राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारामुळे मंगळवेढ्याच्या (Mangalwedha) शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते होणार 20 नोव्हेंबरला सन्मान
'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा...

राज्यातील 69 नगरपालिकांचा या वेळी गौरव करण्यात येणार असल्याचे पत्र नुकतेच पालिकेला प्राप्त झाले. नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये ओडीएफमध्ये 19 वा तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये राज्यात कचरामुक्‍त शहर म्हणून 41 वा क्रमांक मिळवल्यामुळे नगरपरिषदेचा नावलौकिक राज्यात झाला. शहरातील नागरिक, विविध मंडळे व संस्थांच्या सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सातत्य राखल्यामुळे विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला. सलग तीन वर्षे नियोजनबद्ध केलेले कामकाज व कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम, सर्व नगरसेवकांचे सहकार्य यामुळेच हा मान व रोख स्वरूपाच्या बक्षिसामधून शहरातील स्वच्छतेची कामे व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास मदत झाली.

शहरामध्ये 21 सार्वजनिक शौचालये असून 2347 वैयक्तिक शौचालये आहेत. त्यामधील काही लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळवून दिले आहे. शौचालयाची दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. औषध फवारणी केल्यामुळे डासांचे प्रमाण रोखण्यास मदत झाली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रक्रिया पालिकेने राबवली. ओल्या कचऱ्याचे तुकडे करून निर्मिती केलेले खत माफक दरात शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध केले. सुक्‍या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे आयुष्य ज्यादा असल्यामुळे जमिनीचे नुकसान होते म्हणून प्लास्टिक वेगळे करून त्याचे गठ्ठे बांधले जातात. ते औरंगाबाद व सांगली येथील कंपन्यांना पुढील प्रक्रियेसाठी विक्री केली जाते. या कचऱ्यापासून पालिकेला अल्पसे उत्पन्न प्राप्त झाले.

मागील चार वर्षांमध्ये राज्यातील सत्ता आणि नगरपालिका सत्ता परस्परविरोधी असताना देखील प्राप्त निधीतून शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. यापूर्वी पालिकेच्या लोकप्रतिनिधींचा मुंबई व दिल्ली येथे गौरव करण्यात आला आहे. आता तिसऱ्यांदा पालिकेचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याची संधी मिळणार आहे. उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, अनिता नागणे, राजश्री टाकणे, अनिल बोदाडे यांच्यासह इतर सर्व नगरसेवक व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला व नागरिकांनी दिलेल्या साथीमुळे पालिकेला हे मानांकन मिळाले.

कचरामुक्त शहर मंगळवेढा! राष्ट्रपतींच्या हस्ते होणार 20 नोव्हेंबरला सन्मान
मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेले सहकार्य व नागरिकांनी दिलेली साथ यामुळे पालिकेचा देशात नावलौकिक करण्याची दुसऱ्यांदा संधी माझ्या कारकिर्दीत मिळाली.

- अरुणा माळी, नगराध्यक्षा, मंगळवेढा

शासनाच्या विविध उपक्रमांत पालिकेचे लोकप्रतिनिधी, कर्मचारी व नागरिकांनी दिलेल्या साथीमुळे शहरामध्ये विविध विकासकामे केली. त्यातून पालिकेचा नावलौकिक करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले.

- निशिकांत प्रचंडराव, मुख्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com