esakal | Solapur : टपाल खात्याची गौरी ज्येष्ठांसाठी बनली धनलक्ष्मी! लस वितरणामध्येही तत्परता
sakal

बोलून बातमी शोधा

टपाल खात्याची गौरी ज्येष्ठांसाठी बनली धनलक्ष्मी!

कोरोना व लॉकडाउन काळातील निर्बंधांमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या कालावधीत टपाल खात्याकडून घरपोच बॅंकिंग सेवा सुरूच होती.

टपाल खात्याची गौरी ज्येष्ठांसाठी बनली धनलक्ष्मी! लस वितरणात तत्परता

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : कोरोना (Covid-19) व लॉकडाउन (Lockdown) काळातील निर्बंधांमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या कालावधीत टपाल खात्याकडून घरपोच बॅंकिंग सेवा सुरूच होती. टपाल खात्याच्या (Postal Department) गौरी खरे-गर्दने (Gauri Khare-Gardane) यांनी कोरोना काळात घरपोच बॅंकिंग सेवा (Banking Service) दिली. तसेच कोरोनाची लस (Covid Vaccine) उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोचविण्याचे कामही त्यांनी पोस्ट खात्यामार्फत केले.

हेही वाचा: आईच्या पाठिंब्यामुळे महावीर झेंडगेंची दरवर्षी नवीन पदाला गवसणी!

या अनुभवाबद्दल गौरी खरे-गर्दने यांनी सांगितले की, कोरोना महामारीने आपल्या सर्वांनाच घरी राहण्याची वेळ आली. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. मात्र, टपाल खात्याच्या सर्व सेवा अविरत सुरू होत्या. कोरोना काळात टपाल खात्याने टपाल, ठेवीच्या रकमा व आवश्‍यक कागदपत्रे घरपोच केली. पहिल्या कोरोना लाटेत ऐन महामारीच्या कठीण काळात मी ग्रामीण डाकसेवक (मेल डिलिव्हर) म्हणून रुजू झाले. कोरोनाचा काळ होता, त्यामुळे सुरवातीला मला या कामाची भीती वाटत होती. या काळात टपाल, बुक पोस्ट, स्पीड रजिस्टर पत्रे आणि स्पीड रजिस्टर पार्सल या नियमित सेवा मी नियमित देत होते. कोरोनामुळे बॅंका खूप कमी वेळ सुरू असल्याने बॅंकेतून पैसे काढणे कठीण झाले होते. तसेच दळणवळणाच्या सोयी नसल्याने अनेकजणांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे खूपच कठीण होते. हे लक्षात घेऊन आम्ही (इंडिया पेमेंट बॅंक) घरपोच पैसे देण्याची सेवा लोकांना दिली. त्याचप्रमाणे वयोवृद्धांची पेन्शन, जीवन प्रमाणपत्र काढणे अशा सेवा आम्ही घरपोच दिल्या. गरोदर महिलांसाठी पोषण आहार, औषधे यांचे वाटप या काळात केले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना कमीत कमी संपर्कातून जास्तीत जास्त सुरक्षित सेवा दिल्या. यामुळे लोकांना घरी सुरक्षित राहता आले. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले.

हेही वाचा: पवारांच्या गृहप्रवेशाने कोठेंचा पक्षप्रवेश! ठरली महापालिकेची रणनीती

विश्‍वासाहर्ता अन्‌ निष्ठा

कोरोनावरील लस जेव्हा बाजारात उपलब्ध झाली, तेव्हा ही लस खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पोचविण्याचे काम पोस्टाने केले. कोरोना काळातील सेवेला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाले. कुठलीही आपत्ती असो, महामारी असो अगदी दुर्गम खेडेगावात टपाल पोचवले जाते, म्हणूनच भारतीय डाक विभाग सर्व जनतेच्या हृदयात आहे. विश्वासाहर्ता, शिस्त व निष्ठने काम करणे हे डाक विभागाचे वैशिष्ट्य आहे.

पोस्ट खात्यात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली जाते. यामुळे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास महिला कुठेही कमी नाहीत, हे आम्ही दाखवून देऊ शकलो.

- गौरी खरे-गर्दने, ग्रामीण डाकसेवक

loading image
go to top