esakal | पार्क स्टेडिअमच्या पाहणीसाठी येणार गौतम गंभीर ! केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन 
sakal

बोलून बातमी शोधा

3gautam_gambhir_1.jpg

स्मार्ट सिटीतून इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम चकाचक करण्यात आले आहे. रणजी, आंतरराष्ट्रीय सामने खेळविले जातील, असे मैदान आता तयार झाले आहे. मैदानावरील ग्रास, विकेट्‌स, पॅव्हेलियनची डागडुजी, खेळाडूंचे ड्रेसिंग रुम, मैदानाच्या चौहूबाजूंनी जाळी, अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातील या मैदानावर रणजी सामना खेळवूनच मैदानाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होईल, अशी माहिती खासदार डॉ. जससिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. तत्पूर्वी, खासदार तथा माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर हे मैदान पाहणीसाठी येतील, असेही ते म्हणाले.

पार्क स्टेडिअमच्या पाहणीसाठी येणार गौतम गंभीर ! केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : स्मार्ट सिटीतून इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम चकाचक करण्यात आले आहे. रणजी, आंतरराष्ट्रीय सामने खेळविले जातील, असे मैदान आता तयार झाले आहे. मैदानावरील ग्रास, विकेट्‌स, पॅव्हेलियनची डागडुजी, खेळाडूंचे ड्रेसिंग रुम, मैदानाच्या चौहूबाजूंनी जाळी, अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातील या मैदानावर रणजी सामना खेळवूनच मैदानाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होईल, अशी माहिती खासदार डॉ. जससिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. तत्पूर्वी, खासदार तथा माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर हे मैदान पाहणीसाठी येतील, असेही ते म्हणाले.

मैदानाची ठळक वैशिष्टे... 

  • स्टेडिअमचे काम पूर्ण झाले असून आता एप्रिलअखेरीस सोलापूर प्रिमिअर लिगचे नियोजन 
  • मैदानाची चहूबाजूंनी लांबी-रूंदी आहे सरासरी 80 यार्ड- माजी रणजीपटू पांडुरंग साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकेटची (पिच) उभारणी 
  • माजी भारतीय खेळाडू लालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मैदानाची उभारणी व पूर्ण झाली कामे 
  • मैदानावर अमेरिकन बर्मुडा ग्रास; 25 ते 30 हजार मैदानाची प्रेक्षक क्षमता 
  • सरावासाठी मैदानालगत 11 विकेट्‌स तर मैदानावर सामन्यांसाठी तयार केला 10 विकेट्‌सचा पॅच 

विवाह समारंभ असो वा मोठमोठ्या नेत्यांच्या सभांसाठी पार्क स्टेडिअम भाडेतत्त्वावर दिले जात होते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने मैदानाबरोबरच ड्रेसिंग रूमचीही दुरवस्था झाली होती. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या निमित्ताने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून मैदान दर्जेदार करण्यासाठी मोठा निधी मिळाला. त्यातून मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आले आहे. प्रथमत: मैदानावर एप्रिलमध्ये सोलापूर प्रिमिअर लिग भरविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाने पुन्हा जोर धरल्याने आता एप्रिलअखेरीस त्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे पुढील आठवड्यापासून पुण्यात इंग्लडविरुध्द भारताचे तीन क्रिकेट सामने खेळविले जाणार आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तिकीट विक्री बंद असून प्रक्षेकविना हे सामने खेळविले जाणार आहेत. त्यामुळे मैदानाचे उद्‌घाटन आगामी एक-दोन महिन्यात होईल, अशी अपेक्षा आहे. 

रणजीपूर्वी स्थानिक सामन्यांची मालिका 
इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमच्या उद्‌घाटनासाठी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना बोलावण्यासंदर्भात जिल्हा डिस्ट्रिक्‍ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांचाही पाठपुरावा सुरु आहे. मैदानावर रणजी सामने खेळविण्यापूर्वी विकेट पडताळणीसाठी स्थानिक सामने खेळविले जाणार आहेत. 
- चंद्रकांत रेंबर्सू, सचिव, जिल्हा डिस्ट्रिक्‍ट क्रिकेट असोसिएशन, सोलापूर 

loading image