Nagnath Kshirsagar : मी भूमिपुत्र आहे मला खासदारकीची संधी द्या मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी

सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वरचे वर वाढत असतानाच मोहोळ चे नागनाथ क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा दंड थोपटल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. क्षीरसागर यांनी याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे.
Nagnath Kshirsagar
Nagnath KshirsagarSakal

मोहोळ : सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वरचे वर वाढत असतानाच मोहोळ चे नागनाथ क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा दंड थोपटल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. क्षीरसागर यांनी याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत नागरिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नागनाथ क्षीरसागर हे गेल्या 30 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढविल्या आहेत, त्यामुळे निवडणुकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ज्या ज्या वेळी निवडणुका लढविल्या त्या त्या वेळी त्यांचा अगदी थोडक्या मताने पराभव झाला आहे. मोहोळ विधानसभा, तसेच लोकसभा मतदार संघाचा होम टू होम संपर्क आहे.

भाजपच्या अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्य केले आहे. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ हा सी ग्रेड मधून बी ग्रेड मध्ये त्यांनीच आणला आहे. क्षीरसागर हे हिंदू खाटीक समाजातील आहेत, परंतु हिंदू खाटीक ही धनगर समाजाची पोट जात आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे निवडणुकी वेळी त्यांचा पाठिंबा मिळतो. 30 टक्के समाजाची मते व उर्वरित भाजपाची मते असे गणित घातले तर मी सहजासहजी जिंकू शकतो असा दावा त्यांनी केला आहे.

नागनाथ क्षीरसागर हे संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विजयासाठी मतदार संघात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी मतदार संघात सभा घेतल्या होत्या. कामाची धडपड पाहून भाजपाने त्यांना राष्ट्रीय परिषद सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली होती. केंद्र शासनाच्या अनेक सर्वसामान्या साठी असलेल्या योजना त्यांनी राबविल्या आहेत.

दुष्काळात पाणी, चारा वाटप असे उपक्रम त्यांनी राबविले आहेत तर कोरोना काळात हे भरीव काम केले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 70 हजार मते पडली होती. त्यामुळे मी भूमिपुत्र आहे मला संधी द्यावी अशी मागणी त्यांनी भाजपा कडे केली आहे. येत्या आठवड्या भरात मी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com