

Gokul Influence Becomes Key Challenge for BJP in Teacher and Graduate Elections with Shiv Sena Active and NCP Quietly Mobilizing
sakal
-प्रमोद बोडके
सोलापूर : चारच दिवसांवर विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे मतदान आहे. या मतदानापूर्वी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने जोरदार मुसंडी मारली आहे. ‘गोकुळ’च्या निकालातून पश्चिम महाराष्ट्रातील भाजपविरोधकांना मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. शिक्षक, पदवीधरच्या मतदानापूर्वी (शुक्रवार, ता. २३) त्यांच्या या आत्मविश्वासाला तोडण्याचे मोठे आव्हान भाजप नेत्यांसमोर उभे राहिले आहे.