

“Bike-borne thieves snatch two-tola gold chain in Bhosare, Madha Taluka; police begin investigation.”
Sakal
कुर्डुवाडी: रस्त्यावरून घराच्या गेटकडे चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे मिनीगंठण दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून पलायन केले. ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भोसरे (ता. माढा) हद्दीतील तुकारामनगर येथे घडली.