

Golden Woman Sridevi Fulare joins BJP in Solapur, giving a major jolt to the Congress
Sakal
सोलापूर : दोन टर्म नगरसेविका असलेल्या व गोल्डन वूमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्या उपस्थितीत पती जॉन फुलारे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांनी विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला हजेरी लावली.