
Government removes GST from milk business; dairy farmers and producers expect relief.
Sakal
-संदीप गायकवाड
उ. सोलापूर: केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी कर रचनेतून दूध व दुग्धजन्य पदार्थांना सवलत दिली आहे. दूध व पनीर पूर्णपणे करमुक्त तर लोणी तूप यासह इतर पदार्थांवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आइस्क्रीम निर्मितीलाही सरकारने आधार दिला असून आइस्क्रीम वरील १८ टक्के कर कमी करत तो १२ टक्क्यांवर आणला आहे. या नवीन कर रचनेमुळे दुग्ध व्यवसायाला नवीन झळाळी प्राप्त होईल असा दावा केला जात आहे.