Solapur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'विठ्ठल दर्शनातील वशिला आता बंद'; पंढरपुरात मंदिर समितीचा निर्णय
वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचे वारकरी संप्रदाय मधून स्वागत केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज जवळपास एक लाखाहून अधिक भाविक सध्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात.
Pandharpur Temple Committee announces end of recommendation-based Vitthal darshan, ensuring equality for all devoteesSakal
पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने वशिल्याने आधी दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासूनच (ता. ९) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभपणे व लवकर दर्शन मिळण्याची सोय होणार आहे.