शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा खरीपात मिळणार २१०० कोटींचे पीककर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Loan
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा खरीपात मिळणार २१०० कोटींचे पीककर्ज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा खरीपात मिळणार २१०० कोटींचे पीककर्ज

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंक व राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बॅंकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक व क्षेत्र पाहून दोन हजार ९९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करावे लागणार आहे. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने हे टार्गेट दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास पावणेदोन लाख शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज मिळणार आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

नैसर्गिक संकटांना तोंड देत शेतीपिकांची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंकांनी पीककर्ज देताना अडवणूक करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. बॅंकांच्या पीककर्जावर अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांचा वॉच आहे. आतापर्यंत बॅंकांनी खरीप हंगामात जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना पावणेतीनशे कोटींचे पीककर्ज वितरीत केले आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिगरव्याजी मिळणार आहे. कर्जवाटप करताना संबंधित बॅंकांनी त्या शेतकऱ्याच्या शेतातील पीक व क्षेत्र पाहून त्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्याची पत, कर्जाची नियमित परतफेड पाहून त्यांना तीन लाखांवरील कर्ज मॉर्टगेज करून देणे अपेक्षित आहे. पात्र असूनही कर्ज न मिळालेले शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करू शकतात. लोकशाही दिनादिवशी त्या तक्रारींचा निपटारा केला जातो. सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा असल्याने आगामी रब्बी हंगामात या बॅंकांनी दोन हजार १०० कोटींचे पीककर्ज वाटप करणे अपेक्षित आहे. दरम्यान, थकबाकीदार किंवा कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा: विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर

बॅंकनिहाय कर्जवाटपाचे टार्गेट
जिल्हा बॅंकेचे उद्दिष्ट
२३९.९४ कोटी
विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंक
५९.९८ कोटी
राष्ट्रीयीकृत-व्यापारी बॅंका
१७९९.७७ कोटी
खरीपाचे एकूण टार्गेट
२०९९.६९ कोटी

हेही वाचा: शाळांना सुटी अन्‌ पोट भरण्यासाठी निराधार मुले मजुरीवर! सुटीत मिळत नाही पोषण आहार

कर्जासाठी ‘सिबिल’ची अट कायम
बॅंकांची शेती कर्जाची थकबाकी वाढू नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता शेती कर्ज देताना संबंधित शेतकऱ्याचे सिबिल पाहून त्याला पीककर्ज दिले जात आहे. ‘सिबिल’द्वारे तो शेतकरी कोणत्याही बॅंकेचा तथा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नाही, याची ऑनलाइन खात्री केली जाते. पीककर्ज देताना त्या शेतकऱ्याचे सिबिल पाहूनच कर्ज द्यावे, अशा सूचना सर्वच बॅंकांनी त्यांच्या शाखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किमान ६५० असणे अपेक्षित आहे.

Web Title: Good News For Farmers 2100 Crore Peak Loan Will Be Available In Kharif This

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top