esakal | गुड न्यूज ः बंगळूरच्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात यावर्षी सोलापूरची गणेश मूर्ती होणार स्थापन 
sakal

बोलून बातमी शोधा

bengluru murti.jpg

शहरातील रेल्वेलाईन भागात गुडलक शेजारी संजय शहा यांचे मूर्ती विक्रीचे दुकान आहे. दरवर्षी ते चोखंदळपणाने आकर्षक मूर्तीची निवड करत त्याची विक्री ते करतात. मूर्तीचे देखणेपण हे त्यांच्या दुकानातील मूर्तींचे वैशिष्टयच बनले आहे. मूर्ती दुकानात आणल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मित्रांना या मूर्ती पाहण्यास मिळाव्यात म्हणून व्हॉटसऍपवर मुर्तींचे फोटो टाकले होते. संजय शहा यांचे मित्र परेश दावडा यांनी हे फोटो बंगळूरमध्ये त्यांच्या मित्रासमवेत शेअर केले. 

गुड न्यूज ः बंगळूरच्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात यावर्षी सोलापूरची गणेश मूर्ती होणार स्थापन 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः सुंदर डोळे, तलम रंगाचे धोतर आणी आकर्षक बैठकीची सोलापूर शहरात तयार झालेली देखणी गणेश मूर्ती बंगरूळच्या श्री श्री रविंशंकर यांच्या आश्रमात यावर्षी गणेशोत्सवाचे आकर्षण असणार आहे. मूर्तीचे देखणेपणे पाहून भारावलेले आश्रमाचे देवदास यांनी या पुढे देखील आम्ही सोलापूरकरांची मूर्ती आवर्जून मागवणार असा प्रतिसाद त्यांनी मूर्ती विक्रेते संजय शहा यांना दिला. 

हेही वाचाः त्याने घरीच बनवला सव्वा फुट उंचीचा इकोफ्रेंडली गणपतीबाप्पा ! 

शहरातील रेल्वेलाईन भागात गुडलक शेजारी संजय शहा यांचे मूर्ती विक्रीचे दुकान आहे. दरवर्षी ते चोखंदळपणाने आकर्षक मूर्तीची निवड करत त्याची विक्री ते करतात. मूर्तीचे देखणेपण हे त्यांच्या दुकानातील मूर्तींचे वैशिष्टयच बनले आहे. मूर्ती दुकानात आणल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मित्रांना या मूर्ती पाहण्यास मिळाव्यात म्हणून व्हॉटसऍपवर मुर्तींचे फोटो टाकले होते. संजय शहा यांचे मित्र परेश दावडा यांनी हे फोटो बेंगलुरूमध्ये त्यांच्या मित्रासमवेत शेअर केले. 

हेही वाचाः सोलापुरातून दर दोन तासाला एसटी ! इतर जिल्ह्यासाठी हे आहे वेळापत्रक 

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी उत्तम मूर्तीचा शोध आश्रमाचे श्री. देवदास यांनी सुरू केला होता. त्यांना बंगळूरमध्ये सोलापूरमधील या मूर्ती पाहण्यास मिळाल्या. त्यांनी या सर्व मूर्तीची छायाचित्रे पाहिली. 
अचानक त्यांची एका मूर्तीवर दृष्टी खिळली. या मूर्तीची बैठक अत्यंत उत्कृष्ट होती. तसेच या मूर्तीचे नेत्र देखील लक्षवेधी होते. दक्षिणेत शुभ्रवस्त्राच्या बाबतीत असलेले विशेषत्व त्यांना या मूर्तीमध्ये भावले. या गणेश मूर्तीच्या वस्त्राचा रंग तलम वस्त्रासारखा होता. दक्षिणी धार्मिक परंपरेला साजेसी असलेली ही मूर्ती श्री. देवदास यांना अत्यंत आवडली. त्यांनी मूर्ती विक्रेते संजय शहा यांना फोन करून ही मूर्ती आमच्यापर्यंत पाठवा असे सांगितले. कोणताही धक्का न लागता मूर्ती पाठवण्याचे प्रयत्न संजय शहा यांनी सुरू केले. खासगी वाहतुकीची मूर्ती सुरक्षेची खात्री नाही म्हणून त्यांनी रेल्वेद्वारे ही मूर्ती आश्रमात पोहोचवली. गणेश मूर्ती अत्यंत सुरक्षितपणे आलेली पाहून आश्रमवासीयांना आनंद झाला. देवदास यांनी यापुढे आम्ही सोलापूर शहरातून मूर्ती घेत जाऊ, असे श्री. शहा यांना सांगितले. ही मूर्ती सोलापूर येथील मूर्ती कलावंत गोवर्धन शेट्टी यांनी तयार केली आहे. 


सोलापूरला मिळाला सन्मान 

श्री श्री रविशंकर आश्रमात सोलापुरची गणेश मूर्ती स्थापन होणार याचा आनंद होतोय. सोलापुरकरांच्या गणेश मूर्ती कलावंताचा एक प्रकारे गौरवच झाला आहे. 
- संजय शहा, मूर्ती विक्रेते सोलापूर.  

 
 

loading image
go to top