

Land fragmentation rules revised; non-compliant transactions to be regularised soon
Sakal
अहिल्यानगर : तुकडाबंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठी कशाप्रकारे नोंदी घ्याव्यात, अशा व्यवहारांची दस्तनोंदणी कशी करावी, याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित करून दिली आहे. त्यामुळे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार कायदेशीर होणार असल्याने अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या, परंतु मालकी हक्क नसलेल्या लाखो नागरिकांना मालकी हक्क मिळणार आहे.