
उ. सोलापूर : राज्यात गायीच्या दुधाचे खरेदी, विक्री दरांत जवळपास २२ रुपयांची तफावत आहे. दुध उत्पादकांऐवजी इतरच घटक मालामाल होत आहेत. दुध उत्पादकाची लूट थांबवण्यासाठी या व्यवसायालाही साखर उद्योगाप्रमाणे एफआरपी लागू करावी अशी कित्येक वर्षांची मागणी आहे. मात्र सत्तेत आलेल्या एकाही सरकारने याबाबत प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत अशी प्रतिक्रिया सामान्य दूध उत्पादक व्यक्त करीत आहेत.