
Beneficiaries receive the first installment for house construction under the government housing scheme in Solapur district.
Sakal
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून २०२५-२६ वर्षासाठी जिल्ह्यातील एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ८७ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. आतापर्यंत लाभार्थींना प्रत्येकी १५ हजारांचा पहिला हप्ताही वितरित झाला आहे. मात्र, अजूनही १६ हजार लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही बांधकामाला सुरवात केलेली नाही. त्या लाभार्थींचा शोध घेऊन आता त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.