

Kartiki Yatra: Deputy CM Eknath Shinde Reassures Farmers of Strong Government Backing
Sakal
पंढरपूर,( जि. सोलापूर): श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने १३० कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून प्रशासनाने हे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्या. बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे साकडे आपण पाडुरंगांला घातल्याचे सांगताना, राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.