Solapur News : मतदार शुध्दीकरण मोहीमेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या ३ दिवसांच्या सुट्ट्या रद्द

या मोहिमेमध्ये एकूण 16 तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली
govt official holiday cancelled for voter list mission tehsildar madan jadhav politics
govt official holiday cancelled for voter list mission tehsildar madan jadhav politicssakal

मंगळवेढा : काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रशासकीय तयारीस सुरूवात केली असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना तीन दिवस सलग असणाऱ्या सुट्ट्या व रजा रद्द करत आजपासून तालुक्यात सलग तीन दिवस मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत मतदार यादीची तपासणी करणे, दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे वगळणे, 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नव्याने नोंदणी करणे, मतदार यादी मधील नावांमध्ये असणाऱ्या दुरुस्ती करणे अशी विविध कामे केली जाणार आहेत.

या मोहिमेमध्ये एकूण 16 तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामस्तरावर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असे पथक असणार आहे.

या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात मोहीम राबवून मतदार यादीतील दुरुस्ती आणि नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे.तरी या मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

बहुतांश गावातील मतदार यादी मध्ये मयत दुबार व परगावी असलेले मतदार आहेत त्यामुळे त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून येत आहे.यामुळे निवडणुकीतून मतदान करण्याची टक्केवारी देखील कमी होत आहेत.

मयत दुबार आणि परगावी मतदार कमी केल्यास प्रत्यक्ष मतदार संख्या समोर येणार असून त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील जास्त दिसून येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने केलेले निवडणुकीची तयारी महत्वपूर्ण आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com