Gram Panchayat Elections : 26 ग्रामपंचायत निवडणूक साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

राज्य निवडणूक आयोगाने दि. 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा
Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionesakal

मंगळवेढा - रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तालुक्यातील 26 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक विषयक आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने दि. 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक व बालाजी नगर एका ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूकीचा समावेश होता. यापैकी तालुक्यातील ब्रम्हपुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. हिवरगाव या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सहा सदस्य बिनरोध निघाले मात्र एका जागेसाठी ही निवडणूक लागली.एकूण 26 सार्वत्रिक व एका पोट निवडणूकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.

दरम्यान आज या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.प्रचारादरम्यान अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले काही गावात किरकोळ वादाचे प्रसंग देखील उद्भवले. रस्त्यालगत असणारे ढाबा संस्कृती ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे निवडणूक काळात हे ढाबे फुल असल्याचे दिसून आले

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : हायटेक प्रचारासाठी समाजमाध्यमांचा आधार

या निवडणुकीसाठी 94 केंद्रावरती मतदान होणार असून त्यासाठी 115 मतदान पथके तैनात करण्यात आली. या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई तसेच राखीव पथकातील कर्मचारी असे एकूण 690 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रत्यक्ष मतदानासाठी एकूण 94 कंट्रोल युनिट व 135 बैलेट युनिट वापरण्यात येणारी आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून 23 निवडणूक निर्णय अधिकारी, 23 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला; घरोघरी भेटीतून मतांचा जोगवा; ५ नोव्हेंबर रोजी मतदान

संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसील कार्यालयातील 9 अव्वल कारकून, 8 मंडळ अधिकारी, 38 तलाठी, 6 महसूल सहायक, 4 शिपाई, 40 कोतवाल आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तालुक्यातील शेलेवाडी, शिरशी, खडकी, जुणोनी, देगाव, अकोले, बठाण, उचेठाण, महमदाबाद हुन्नर, रेवावाडी, चिक्कलगी, भाळवणी, जंगलगी, डीकसळ, मुंढेवाडी, खुपसंगी, निंबोणी, लोणार, लमाणतांडा, मानेवाडी, लक्ष्मी दहिवडी, रड्डे, नंदूर, आंधळगाव, पडोळकरवाडी, जालिहाळ, हिवरगाव या गावातील एकूण 70 उमेदवार सरपंच पदासाठी तर एकूण 517 उमेदवार सदस्य पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

निवडणूक विषयक संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, सोमनाथ साळुंखे आणि संदीप हाडगे हे पार पाडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com