Solapur News : मानधन नको, वेतन द्या ; ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकार आपल्या मागण्याविषयी सकारात्मकता घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त
 gram sevak protest in front of collector office for wages timely solapur
gram sevak protest in front of collector office for wages timely solapursakal

मंगळवेढा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतकडील ग्रामरोजगार सेवकांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकार आपल्या मागण्याविषयी सकारात्मकता घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

.2005 च्या कायद्यान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी देशपातळीवर सुरू करण्यासाठी दि. 26 जानेवारी 2008 च्या ग्रामसभेतून गाव पातळीवरील नोंदणीकृत मजुरांची काम मागणी करणे,

कामाचे हजेरी घेणे त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवणे व तालुकास्तरावर हजेरी पत्रक जमा करणे या कामासाठी ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती केली.वास्तविक पाहता या नियुक्तीमध्ये मजुरानी केलेल्या कामाच्या टक्केवारीवर मानधन निश्चित केले.

 gram sevak protest in front of collector office for wages timely solapur
Kasba Bypoll Election : कसबा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, कसब्यातील दोन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल

वास्तविक पाहता त्यांना या योजनेचे काम करताना गाव पातळीवरून तालुका स्तरावर येण्यासाठी होणारा खर्च व मिळणारे मानधन याचा हिशोब करताना ही योजना ग्रामरोजगार सेवकासाठी काम जास्त मानधन कमी अशी अवस्था झाली.

यामध्ये अनेक रोजगार सेवक यांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी मोठी हेळसांड झाले याशिवाय या योजनेचे सर्व जबाबदारी रोजगार सेवकावर असताना देखील शासनाने त्यांच्या मागण्याबाबत कायमस्वरूपी धोरण निश्चित केले नसल्यामुळे या योजनेतून जिल्ह्यात म्हणावे तसे काम झाले नाही त्यामुळे ही योजना देखील जिल्ह्यामध्ये कागदावर राहण्यास प्रशासनाची व लोकप्रतिनिधी निष्काळापणा कारणीभूत ठरला.

 gram sevak protest in front of collector office for wages timely solapur
Tiktok Ban : चीनला मोठा झटका! भारतानंतर आता कॅनडाने घेतला TikTok बाबत मोठा निर्णय

गट महिन्यात रोजगार हमी योजनेचे मंत्री संदिपान भुमरे यांनी बैठक घेतली त्यांनीही या प्रश्नावर त्यांनी अद्याप तोडगा काढला नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आयुष्याचा दुष्काळ हटण्यास मदत होत.

असताना देखील योजनेच्या अंमलबजावणीसाठी रोजगार सेवकांच्या मागण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दयानंद कांबळे व जिल्हाध्यक्ष अजिनाथ ताटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात

 gram sevak protest in front of collector office for wages timely solapur
March 2023 Release : अजय-रणबीर आमने सामने! कोण गाजणार, कोण आपटणार? मार्चमध्ये धुराळा

मानधन नको, वेतन द्या विमा संरक्षण लागू करा आधी मागण्याच्या जी.आर त्वरित काढण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश केंगार, उपाध्यक्ष काशिनाथ बागलकोट, दादासाहेब पवार ,अवधूत खडतरे,

विद्या भजन दास पवार, परमेश्वर मोरे अशोक कुमार होटकर, धनराज कोळी, संघाप्पा बिराजदार ,विठ्ठल पाटील,मारुती घोगरे, मुकुंद जांभळे महेश भोसले , शुभांगी धपाटे, नेताजी कापसे बंडू पाटील,सुभाष कुंभार राणोबा इमडे आदी पदाधिकारी ग्राम रोजगार सेवक या धडक मोर्चा मध्ये सामील झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com