Kasba Bypoll Election : कसबा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, कसब्यातील दोन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : कसबा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, कसब्यातील दोन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल

बहुचर्चित अशी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. मतदान पार पडेपर्यंत आणि मतदान संपेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतदानाची जास्तच चर्चा रंगली होती. हेमंत रासणे यांनी मतदानाला जाताना गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करून बाहेर पडले. या प्रकरणी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत उपोषण केलं होतं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याच्या कारणामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं. मतदानाचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. तर आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

टॅग्स :pune