माळेवाडी येथील ग्रामसेवक निलंबित; कारण काय? वाचा सविस्तर 

Fraud
Fraud
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील माळेवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवकास लेखा संहिता अधिनियम 1911 प्रमाणे आर्थिक व्यवहार न करता, सरपंचाच्या बोगस सहीने ग्रामपंचायत खात्यातील रक्कम काढून अपहार करणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, अनियमित व संशयास्पद व्यवहार करणे व इतर कारणास्तव मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सेवेतून निलंबित करण्यात आले. 

याबाबत माहिती अशी, की आर. एस. सोनवणे हे ग्रामसेवक म्हणून तालुक्‍यातील माळेवाडी येथे कार्यरत असताना, तत्कालीन सरपंचाच्या सहीने ग्रामपंचायत खात्यातील रक्कम काढून आर्थिक गैरव्यवहार करणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, नियमित कामकाज व संशयास्पद अपहार करणे, ग्रामपंचायतीच्या विविध योजनांतील कामकाजात आर्थिक अनियमितता करणे, विद्यमान सरपंच व सदस्यांना विश्‍वासात न घेता ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज करणे असे करत या ग्रामसेवकाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी घरपट्टी, विविध कर वसुली पावती क्रमांक 1 ते 22 रक्कम 35 हजार 792 रुपये, पाणीपट्टी पावती क्रमांक 1ते 16 रक्कम 25 हजार 340 अशी 61 हजार 132 रुपयाची वसुली केली. 

ही रक्कम ग्रामपंचायत खाते क्रमांकावर भरणा न करता नियमबाह्य हातावर शिल्लक ठेवून परस्पर खर्च करून ग्रामपंचायत कामकाजामध्ये आर्थिक अनियमितता केली. तसेच स्थानिक विकास योजना व जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत तीन लाख 85 हजार 100 रुपये जमा असून मूल्यांकन प्रमाणे दोन लाख 46 हजार व एक लाख 31 हजार असा एकूण तीन लाख 77 हजार खर्च केला. या कामाबाबत अनामत रक्कम 14 हजार 800 रक्कम जेसीबी भाडे अदा केली असून धनादेशावर तत्कालीन सरपंच न्यामगुंडे व सोनवणे यांची सही आहे. विद्यमान सरपंच यांचा कालावधी असताना तत्कालीन सरपंच यांची स्वाक्षरी घेऊन आर्थिक नियमितता केली. चौदाव्या वित्त आयोगातून 2016-17 व 2017-18 मध्ये अंगणवाडी दुरुस्तीचे देयक क्रमांक 5 ते 9 14 ऑक्‍टोबर 2019 रोजी 99 हजार 699 रुपये स्वतःच्या नावे धनादेश काढून अनियमिता करणे, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केल्याने गटविकास अधिकारी यांनी तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 17 मार्च 2019 ला दिला. ग्रामसेवकाला सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्याला मुख्यालय बार्शी पंचायत समिती येथे हजर राहण्यास कळविण्या आले. हा ग्रामसेवक सध्या लोणार येथे कार्यरत असून हुलजंती या मोठ्या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देखील त्याच्याकडे आहे. त्यामुळे सध्या तालुक्‍यामध्ये ग्रामसेवकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सोनवणेच्या निलंबनाने रिक्त झालेल्या गावाला नवीन अतिरिक्त पदभार असलेला ग्रामसेवकच मिळणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

ashti medium project water storage 60 percent farmers demand eight hours electricity supply for irrigation in mohol solapur
Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River
POCSO Case
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com