कंटेनरच्या धडकेने आदर्श ग्रामसेविकेचा जागीच मृत्यू

शासकीय काम आटपून घराकडे निघालेल्या ग्रामसेविकेच्या स्कुटीला कंटेनरने ओव्हरटेक करताना धडक दिल्याने ग्रामसेविकेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Swapnali Sonalkar
Swapnali SonalkarSakal
Summary

शासकीय काम आटपून घराकडे निघालेल्या ग्रामसेविकेच्या स्कुटीला कंटेनरने ओव्हरटेक करताना धडक दिल्याने ग्रामसेविकेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सांगोला - शासकीय काम आटपून सांगोल्याहून घराकडे निघालेल्या ग्रामसेविकेच्या स्कुटीला कंटेनरने ओव्हरटेक करताना धडक दिल्याने स्कुटीवरील ग्रामसेविकेच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास कडलास (ता. सांगोला) येथे घडला आहे. स्वप्नाली सोनलकर (वय - 35 वर्षे, रा. कडलास, ता. सांगोला) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळालेल्या महिला ग्रामसेविकेचे नाव आहे.

वारकऱ्यांच्या पायी दिंडीत कार घुसून 8 वारकरी ठार झालेली जुनोनी (ता. सांगोला) येथील घटना ताजी असतानाच हा अपघात घडला आहे. स्वप्नाली सुनिल सोनलकर (रा. कडलास, ता. सांगोला) या सध्या बुरंगेवाडी (ता. सांगोला) येथे ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव मेडशिंगी असून कडलास (वाघमोडेवस्ती) हे त्यांचे सासर आहे. सोनलकर या सोमवारी (ता. 7) रोजी पंचायत समिती सांगोला येथे दिवसभर आपले शासकीय काम आटोपून सायंकाळी त्या आपल्या हिरो प्लेजर (क्रमांक - एम. एच - 45, वाय - 3043) स्कुटीवरून कडलासकडे घरी जात होत्या.

पाठीमागून भरधाव वेगाने कंटेनरने (क्रमांक - एन. एल - 01, ए. ई - 1629) त्यांच्या स्कुटीला ओव्हरटेक करून बाजूला घेत पाठीमागच्या बाजूने धक्का दिला. त्यामुळे ग्रामसेविका सोनालकर आपल्या गाडीवरून खाली पडल्या व या अपघातात दुर्दैवाने कंटेनरच्या पाठीमागील बाजूच्या चाकाखाली पडल्या. चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकारानंतर कंटेनर चालकाने आपले वाहन न थांबवतात तसाच कंटेनर पुढे घेऊन गेले. नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रवीण परमेश्वर पवार (रा. तांबोळे, ता. मोहोळ) असे चालकाचे नाव आहे. या अपघाताची वृत्त समजताच सर्वच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयातकडे धाव घेतल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. अजितराव उत्तम अनुसे (रा. कडलास, ता. सांगोला) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com