Married Life: लग्नाचं अर्धशतक ठोकणारे आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत'

Marriage Anniversary Celebration: आनंदाने संसार करणारी आठ जोडपी बोहल्यावर; गुलाब पाकळ्यांच्या अक्षतारुपी शुभेच्छात चिंब चिंब
Married Life
Married Life Esakal

आजकालची नवविवाहित जोडपी लग्नाच्या काही वर्षानंतर किरकोळ घटना, मन (ईगो) दुखावल्यामुळे घटस्फोट घेण्याइतपत टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे संसार आणि मुले उघड्यावर पडत आहे.

ही समस्या अनेक समाजात घडत आहे, अशा घटनांवर किंचितसा प्रभाव पडावा या उद्देशाने सुखाने संसार करणाऱ्या व लग्नाचं अर्धशतक ठोकणाऱ्या आठ आजी-आजोबांचा पुन्हा विवाह सोहळा (महोत्सवम्‌) लावण्यात आला.

गोरज मुहूर्तावर गुलाब पाकळ्यांच्या अक्षतारुपी शुभेच्छांनी आजी-आजोबा या निमित्ताने चिंब चिंब झाले.

दाजी पेठेतील श्रीराम मंदिर येथे प्रारंभी श्री गणेश पूजा, श्री लक्ष्मी-नारायण पूजा व महर्षी मार्कंडेय महामुनींचे पूजा अनुक्रमे यंत्रमाग कारखानदार रघुरामुलू कंदीकटला, सामाजिक कार्यकर्ते गोपीकृष्ण वड्डेपल्ली आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या यांच्या हस्ते करून आठ जोडप्यांना कंदीकटलातर्फे टोपी, टॉवेल, वड्डेपल्लीतर्फे साडी-चोळी आणि कोठेंतर्फे पुष्पहार देण्यात आले.(Latest Marathi News)

Married Life
Manipur Violence: पीडितांना केंद्राचा दिलासा! मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई

यावेळी आजी-आजोबा एकमेकांना हार घातल्यावर पद्मशाली पुरोहित संघमच्या वतीने आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. ‘अक्षता’ म्हणून तांदळाऐवजी गुलाब पाकळ्यांचा उपयोग करण्यात आला.

या नवीन संकल्पनेमुळे वऱ्हाडी आणि जोडपे यांना वेगळेच आप्रुरुप वाटले. विवाह सोहळ्यानंतर जोडप्यांच्या (आजी-आजोबा) घरी रात्रीचे भोजन नातेवाईकांसाठी केल्याने पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्याने सर्वच आनंदात होते.

पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष देविदास अन्नलदास यांच्या मार्गदर्शनाखाली वेणुगोपाल म्याना, ओमप्रकाश सामल, अविनाश श्रीमल, अरविंद जिल्ला, हरिकृष्ण नल्ला, नागेश अंकम, सुधीर सोमा यांनी पौरोहित्य केले.(Latest Marathi News)

Married Life
BMC: खिशात नाही अडका अन्.. पैसे नाहीत म्हणणाऱ्या BMC ची मोदींच्या कार्यक्रमात कोट्यवधीची उधळण

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून, मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, सदस्य किशोर व्यंकटगिरी वैकुंठ म. जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, पद्मशाली सखी संघमच्या सचिवा ममता मुदगुंडी, सहसचिवा जमुना इंदापुरे, सहखजिनदार ममता तलकोकूल आणि विमल पुठ्ठा यांनी परिश्रम घेतले.(Latest Marathi News)

Married Life
Sanjay Shirsat: सुषमा अंधारेंना धक्का! 'त्या' प्रकरणी संजय शिरसाटांना पोलिसांकडून क्लिन चीट

याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष महेश कोठे, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, अखिल भारत पद्मशाली संघमचे सचिव सत्यनारायण गुर्रम, महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम, ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा, जनता सह.बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, माजी नगरसेविका भारती ईप्पलपल्ली, पुरुषोत्तम पोबत्ती, हरिनिवास बिल्ला छत्रपती अवशेट्टी यांच्यासह निलगार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com