
सोलापूर : घरी असताना दोन अनोळखी क्रमांकावरून सम्राट चौकातील एका करवा नामक व्यावसायिकास कॉल आला. एकाने त्यांच्याकडे ग्रीन गवताची मागणी करीत ॲडव्हान्स पाठविले होते. करवा यांनी व्हॉट्सॲपवरील ओळखीच्या व्यक्तीकडून समोरील व्यक्तीला ते गवत पोच केले होते. सुरवातीला ३० हजार रुपयांचे गवत दिले, पण त्यानंतर विश्वास संपादन करून सायबर गुन्हेगारांनी करवा यांना सव्वादोन लाख रुपयाला फसविले. यासंदर्भात सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.