
सोलापूर : उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पूर्वी वर्षाला २० ते २२ टीएमसी पाणी सोडले जात होते. आता उजनी ते सोलापूर दरम्यान समांतर जलवाहिनी झाल्याने सोलापूरसाठी दोन टीएमसी एवढेच पाणी लागणार आहे. या शिवाय पंढरपूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाईल. पंढरपूरसाठी किती पाणी लागेल?, समांतर जलवाहिनी झाल्यानंतर किती पाणी शिल्लक राहते, याचा अहवाल आठ ते दहा दिवसांत सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.