

Guardian Minister Jaykumar Gore addressing corporators and officials during a review meeting.
Sakal
सोलापूर : महापालिका निवडणुकीत अनेक अडचणींना सामोरे जात भाजपने मोठे यश मिळविले आहे. पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. नगरसेवकांसाठी विकास आराखडा दिला जाईल. आपण सेवक आहोत, या भावनेने काम करायचे आहे. काही दिवसांत महापौरांसह इतर पदांच्या निवडी होतील. या निवडीवर नगरसेवकांनी माध्यमांसमोर बोलायचे नाही, सेवकासारखे वागा, असा सज्जड इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.