रुग्णालयाच्या ऑक्‍सिजन वापरावर ठेवा नियंत्रण ! पालक सचिव दिनेश वाघमारेंच्या सूचना

पालक सचिव वाघमारे यांनी सूचना केली की रुग्णालयाच्या ऑक्‍सिजन वापरावर नियंत्रण ठेवा
Dinesh Waghmare
Dinesh WaghmareCanva
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा ऑक्‍सिजनअभावी (Oxygen) मृत्यू होऊ देऊ नका. ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू देऊ नका. ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची (Ventilator) आवश्‍यकता असणाऱ्या रुग्णांनाच देण्याचे नियोजन करा. यासाठी रुग्णालयांच्या ऑक्‍सिजनवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव तथा ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे (Guardian Secretary Waghmare) यांनी केल्या. (Guardian Secretary Waghmare suggested controlling the oxygen consumption of the hospital)

श्री. वाघमारे यांनी आज (सोमवारी) जिल्ह्यातील कोरोना स्थिती, ऑक्‍सिजन, लसीकरण याबाबत ऑनलाइन बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉ. वैश्‍यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर आदी उपस्थित होते.

Dinesh Waghmare
बालरोगतज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेत लहान मुले बनू शकतात सुपर स्प्रेडर ! अशी घ्या खबरदारी

श्री. वाघमारे म्हणाले, ऑक्‍सिजनचा आणि व्हेंटिलेटरचा वापर करताना दवाखान्यात, डीसीएच, डीसीएचसीमध्ये प्रशिक्षित स्टाफ असायला हवा. त्यांना आणखी प्रशिक्षण द्या. ऑक्‍सिजनच्या बाबतीत कोठेही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी फायर ऑडिट करा. कोरोना रुग्णांच्या दवाखान्यात कोठेही विजेची अडचण येणार नाही, हे पहा. रुग्ण पहिल्या स्टेजमध्येच उपचारासाठी पोचला पाहिजे, याचेही नियोजन करा. जिल्ह्यात कोठेही रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घ्या. इंजेक्‍शनची गरज आणि वापर कमी करा, रेमडेसिव्हिरची बनावट विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या वेळी डॉ. कडूकर म्हणाल्या, शहरात लॉकडाउनबाबत दंडात्मक कारवाई सुरू आहे. होलसेल आणि रिटेल विक्रेत्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. पोलिसांसाठी 30 बेड ऑक्‍सिजननंतर 30 खासगी व्यक्तींसाठी सोय केली आहे.

Dinesh Waghmare
हरणाच्या अवघ्या दोन दिवसांच्या पाडसाला मिळाले शेळीच्या दुधामुळे जीवदान !

बैठकीतील ठळक...

  • ग्रामीण भागाचा मृत्यूदर 1.60 टक्के

  • सोलापूर शहराचा मृत्यूदर 7.86 टक्के

  • सीएसआरमधून साहित्य, यंत्रसामग्री उपयोगात येणारी आणि हाताळण्यास सुलभ असणारीच खरेदी करा

जिल्ह्यातील 115 हॉस्पिटल्समध्ये पाच अभियंता महाविद्यालयाच्या तज्ज्ञांना पाठवून त्रुटी दूर करून फायर ऑडिट केले आहे. ऑक्‍सिजनसाठी नवीन 14 ठिकाणी प्लांट बसवत असून सध्या 48 मेट्रिक टन एवढा ऑक्‍सिजन प्राप्त आहे. सर्व डॉक्‍टरांना ऑक्‍सिजन बचतीच्या सूचना दिल्या आहेत.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

Dinesh Waghmare
"क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबाला आला भाव ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतोय वापर

तालुका, जिल्हा रुग्णालयांवर भार पडू नये यासाठी जिल्ह्यात 100 ठिकाणी पाच हजार लोकसंख्येच्या गावात कोव्हिड केअर सेंटर उभारणार आहे. यापैकी 60 ठिकाणी सीसीसी सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेमार्फत औषध पुरवठा करण्यात येत असून खासगी डॉक्‍टरांची सेवा घेण्यात आली आहे.

- दिलीप स्वामी, सीईओ, जिल्हा परिषद

शेजारील राज्यातील, जिल्ह्यातून शेवटच्या स्टेजमधील रुग्ण येत असल्याने मृत्यूदर शहराचा वाढत आहे. शहरात 335 डीसीएच / डीसीएचसी दवाखाने असून 448 आयसीयू आणि 191 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवर रोज बेड उपलब्धेबाबत माहिती दिली जाते.

- पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून जिल्ह्यात तीन केसेस नोंद केल्या आहेत. कडक लॉकडाउनची कारवाई सुरू असून 250 होमगार्ड, 10 रेल्वे पोलिस अधिकारी यांच्याही सेवा घेण्यात आल्या आहेत. पोलिसांना कोरोना झाला तर तत्काळ उपचारासाठी पंढरपूर पोलिस संकुल येथे केवळ 38 तासांत सर्व सुविधायुक्त 82 बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलची उभारणी केली आहे. यामध्ये 42 ऑक्‍सिजनचे बेड व इतर 40 बेड आहेत.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com