येरमाळा - सोलापूर धुळे महामार्गावरील चोराखळी येथील कलाकेंद्र परिसरातील एका डान्सबारसमोर सोमवारी (ता.४) रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा गुट्टे (वय-४०) हे जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जुन्या भांडणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.