Gutkha Seized : बार्शीत पोलिसांनी पकडला ७६ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा; दोघांना अटक

बार्शी-लातूर रस्त्यावर गुटख्याच्या गोण्या भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापा टाकून ५९० गोण्या गुटखा भरलेला ट्रक ताब्यात घेतला.
Gutkha Seized
Gutkha Seizedsakal
Summary

बार्शी-लातूर रस्त्यावर गुटख्याच्या गोण्या भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापा टाकून ५९० गोण्या गुटखा भरलेला ट्रक ताब्यात घेतला.

बार्शी - बार्शी-लातूर रस्त्यावर गुटख्याच्या गोण्या भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापा टाकून ५९० गोण्या गुटखा भरलेला ट्रक ताब्यात घेतला असून, ७६ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा आहे. तर २५ लाखांची ट्रक असा १ कोटी १ लाख ७० हजार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सहाजणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

वाहन चालक अतिकमिया खुर्शिदमिया नाईकोडी (वय २९), जावेद पाशा अब्दुल सत्तार चेंगटा (वय ३५, दोघे रा. चुम्मनचोड, ता. चिंचोली, जि. गुलबर्गा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाहन मालक सद्दाम हुसेन अब्दुल सत्तार (रा.८३/२ मदिना कॉलनी, बसवकल्याण, बिदर, कर्नाटक), पुरवठादार गुलाम अली (रा. चुम्मनचोड), साठा मालक अभिद नाईक, इमरान नाईक (रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना २९ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता घडली.

लातूर रस्त्यावर एमआयटी कॉलेज लगत ट्रक उभा असून, त्यामध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच के. ए. ५६-०१४४ या क्रमांकाचा ट्रक उभा असल्याचे पोलिस पथकाला दिसले. ट्रकसोबत असलेल्या दोघांना माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

ट्रकमधील गोण्यांची तपासणी केली असता हिरा पानमसाला नाव असलेल्या ३९० गोण्या याची किंमत ५० लाख ७० हजार रुपये, तर रॉयल ७१७ नावाच्या सुगंधी तंबाखूच्या २०० गोण्या, याची किंमत २६ लाख रुपये आहे. पोलिसांनी २५ लाखांची किंमत असलेला ट्रक पोलिस ठाण्यात आणून जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, ज्ञानेश्वर उदार, पोलिस शैलेश चौगुले, अमोल माने, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, रविकांत लगदिवे, अविनाश पवार, अंकुश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com